Rajasthan:  राजस्थानच्या भिवडी येथील एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. दुकानात शिरताच पाच जणांवर बंदुक दाखवत दागिने चोरले. ही घटना संध्याकाळी ७च्या सुमारास घडली. चोरट्यांनी दुकानात गोळीबार केला. या गोळीबारच्या घटनेत एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला. तर आणखी एक जण जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. बंदूकीच्या धाकेवर त्यांनी दुकानातील सोने चोरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा- विम्याचे 25 लाख मिळावेत म्हणून पतीने केली पत्नीची हत्या; दिले सापाच्या विषाचे इंजक्शन, गुन्हा दाखल)

(सोन्याच्या दुकानात चोरी पाहा व्हिडिओ )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)