Jammu Kashmir News: जम्मू आणि काश्मीर येथून एक दु:खद घटना समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्यामुळेपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की, सीआरपीएफ जवान, शिपाई अजय कुमार असे ओळख पटवून देण्यात आले आहे. अजय कुमार शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री सेल चेरसू परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आत्महत्या केल्याचे  जम्मू काश्मीर पोलीसांनी माहिती दिली आहे. पहाटे 1.55 च्या सुमारास परिसरात गोळ्यांचा आवाज ऐकू आला, असं" एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे त्यामुळे, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाहीत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)