श्री राम जन्मजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडून 4 जानेवारीला अयोद्धेमध्ये साकारले जात असलेल्या राम मंदिराची अजून काही खास वैशिष्ट्यं समोर ठेवण्यात आली आहेत. ट्रस्टच्या माहितीनुसार, नगर वास्तूशैलीचा पगडा या मंदिरावर दिसणार आहे. 3 मजली या मंदिरामध्ये प्रत्येक मजला 20 फीट उंच असेल. तर 380 फीट X 250 फीट अशी जागा असेल. मंदिराला 392 खांब असतील आणि 44 दरवाजे असतील. यावर अत्यंत नाजूक कोरीवकाम असणार आहे. मुख्य गर्भगृहात प्रभू रामाचे बाल रूप असलेल्या श्री राम लल्लाची मूर्ती आहे, तर पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार आहे. Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल?
राममंदिराची सर्व खास वैशिष्ट्ये पाहण्यासाठी
Features of Shri Ram Janmbhoomi Mandir
1. The Mandir is in the traditional Nagar style.
2. The Mandir has a length (east-west) of 380 feet, a width of 250 feet, and a height of 161 feet.
3. The Mandir is three-storied, with each floor being 20 feet tall. It has a total of 392… pic.twitter.com/Sp2BzzU5sv
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)