Liquor Tax: हिमाचल प्रदेशमध्ये आता दारू प्यायची असेल तर गाय सेवा करावी लागेल, असा प्रस्ताव हिमाचल प्रदेश सरकारने तयार केला आहे. सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने असा नियम केला आहे की, जो कोणी दारू पिईल त्याला गाय सेवा कर भरावा लागेल. म्हणजेच आता मद्यविक्रीवर गाय कर लावण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, दारूच्या बाटल्यांच्या विक्रीवर 10 रुपये प्रति बाटलीचा गाय उपकर लावला जाईल. यातून सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची माहिती हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)