EAM S Jaishankar Dares Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत असून, तिथे त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. यावरून आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री सध्या दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. जयशंकर केपटाऊनमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांशी बोलत होते. दरम्यान, भारतीय वंशाच्या व्यक्तीने राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत प्रश्न केला. यावर जयशंकर म्हणाले, "बघा, मी माझ्यासाठी बोलू शकतो. मी परदेशात गेल्यावर राजकारण न करण्याचा प्रयत्न करतो. जर मला वाद घालायचा असेल तर. मी ते माझ्या देशात करेन. लोकशाही देशात प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी, राष्ट्रहित, सामूहिक प्रतिमा असते. काही गोष्टी राजकारणाच्या वरच्या असतात. देशाबाहेर पाऊल ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पण याचं उत्तर मी घरी जाऊन देईन." (हेही वाचा - Odisha Train Accident: रेल्वे अपघात कसे टाळता येऊ शकतात? भारत 'या' देशांकडून प्रगत तंत्रज्ञान प्रणाली अवगत करू शकतो; काय आहे रेल्वे अपघात रोखण्याचं तंत्रज्ञान? जाणून घ्या)
#WATCH | ..."There are sometimes, things bigger than politics & when you step outside the country, that is important to remember...I differ with them but how I counter it, I would like to go home and do it. Watch me when I get back": EAM S Jaishankar when asked about Congress… pic.twitter.com/7h0YutokpH
— ANI (@ANI) June 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)