Nainital Fire News:  उत्तराखंडातील नैनिताल आणि त्याच्या आसपासच्या जंगलात भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हवाई दलाचे Mi -17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरने भीमताल तलावातून पाणी भरून पाइन्स परिसरातील आग विझवण्याचे काम करत आहे. नैनितालला लागून असलेल्या पाईन्स, भूमिधर, जिओलीकोट, नारायणनगर, भवाली, रामगड, मुक्तेश्वर आदी जंगलांना आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, अग्निशमन विभाग आणि वनविभाग व्यतिरिक्त घटनास्थळी लष्करी जवान देखील बचाव काम करत आहे.  (हेही वाचा- कुकी अतिरेक्यांचा मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)