UPI ATM: केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी UPI एॅप्लिकेशनसह सक्षम केलेल्या एटीएमचा व्हिडिओ शेअर केला आहे. पियुषने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.आणि लिहले आहे फिनटेकचे भविष्य येथे आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस UPI एटीएममधून पैसे काढताना दिसत आहे. तो प्रथम एटीएम स्क्रीनवर प्रकर्शित यूपीआय कार्डलेस कॅश पर्यायावर क्लिक करतो आणि पैसे काढण्याची रक्कम विचारली जाते. रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रिनवर एक क्यूआर कोड दिसेल. त्यानंतर तो UPI अॅप वापरून QR कोड स्कॅन करतो आणि त्याचा पिन टाकतो. काही वेळानंतर रोख रक्कम वितरीत करते.

UPI ATM व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)