Former Student Opens Fire In School: केरळ येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका शाळेत माजी विद्यार्थ्याने गोळीबार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. केरळ राज्यातील त्रिशूल परिसरातील ही घटना आहे. माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. तरुणाने शाळेतील वर्गात घुसुन गोळीबार केला. शाळेतील कर्मचाऱ्यांना तरुणाने बंदुकीचा धाक दाखवला. गोळीबार घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी तरुण शाळेतील माजी विद्यार्थी असल्याचे समजले आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केले. त्रिशुल येथील विवेकोदयम शाळेत जाऊन आरोपी तरुणाने हा प्रकार घडवला, जगन असं आरोपी तरुणाचे नाव आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरपोली पकडण्यात आले.
STORY | Former student opens fire in school in Kerala's Thrissur, no casualty
READ: https://t.co/TkdCviAZ9T
VIDEO: pic.twitter.com/67KPYvBZZT
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)