माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि काँग्रेस नेते मनोहर सिंग गिल यांचे रविवारी (15 ऑक्टोबर) निधन झाले. सोमवारी (16 ऑक्टोबर) दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मविभूषण पुरस्कार विजेते गिल यांनी दक्षिण दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 1996 ते 2001 पर्यंत त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले. काँग्रेस सरकारमध्ये ते युवा कार्य आणि क्रीडा मंत्रीही होते. याशिवाय त्यांनी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रीपदही भूषवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)