राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर ग्रेस मार्क्स आणि अव्वल येणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवर आक्षेप नोंदवत काही विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षेची मागणी केली होती मात्र निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्याला कोर्टाने नकार दिला आहे. सध्या याप्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलैला पुढे ढकलण्यात आली आहे. परंतू NTA ला नोटीस जारी करत कोर्टाने अहवाल मागवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे, त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे. असा शेरा  मारला आहे.  NEET Result 2024 Controversy: नीट-यूजी 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन होणार; शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली समिती .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)