NEET Result 2024 Controversy: देशात NEET-UG 2024 च्या निकालांवर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 1,500 हून अधिक उमेदवारांना दिलेल्या ग्रेस गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती आठवडाभरात आपला अहवाल सादर करणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटवर 4 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, त्यानंतर या निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप केला. निकालाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना जास्त ग्रेस गुण देण्यात आल्याचे समोर आले. आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट 2024 मध्ये कथित हेराफेरीच्या आरोपांवर मोठा निर्णय घेतला आहे.
शिक्षण मंत्रालयाने नीट परीक्षा आणि निकालातील हेराफेरीची चौकशी करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध सिंग म्हणाले की, शिक्षण मंत्रालयाने NEET-UG मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1,500 हून अधिक उमेदवारांच्या निकालांची पुनर्तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. (हेही वाचा: QS World University Ranking: भारतामधील IIT Bombay आणि IIT Delhi चा जगातील टॉप-150 विद्यापीठांच्या यादीत समावेश; MIT पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर)
पहा पोस्ट-
Education ministry sets up panel to reexamine results of over 1,500 students awarded grace marks in NEET-UG: NTA DG Subodh Singh
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)