महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5वी व इ. 8वीचा निकाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पाचवीचे 1 लाख 13 हजार 939 विद्यार्थी, तर आठवीचे 55,557 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यात दोन्ही वर्गात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला राज्यभरात घेण्यात आली होती. अंतरिम निकाल http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. (हेही वाचा: JEE Main 2023 Result: जेईई मेनचे निकाल जाहीर; 43 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के पर्सेंटाइल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)