नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 29 एप्रिल रोजी जेईई मेन्स्स 2023 (JEE Mains 2023) सत्र-2 चा निकाल आणि टॉपर्सची यादी प्रसिद्ध केली आहे. टॉपर्सची यादी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अपलोड करण्यात आली आहे. सत्र-2 मध्ये एकूण 43 उमेदवारांनी 100% पर्सेंटाइल मिळवले आहेत. यावर्षी सुमारे नऊ लाख उमेदवार जेईई मेन सेशन 2 ची परीक्षा 2023 मध्ये बसले आहेत. निकालासोबतच अंतिम उत्तर की, टॉपर्सची यादी, ऑल इंडिया रँक लिस्ट, कट ऑफ, पर्सेंटाइल आणि इतर माहिती JEE च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. (हेही वाचा: Maharashtra Board SSC, HSC Results 2023 Dates: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध; कधी पर्यंत लागू शकतात यंदाचे निकाल?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)