Maharashtra Board 10th, 12th Results 2023 Dates: महाराष्ट्रात यंदा कोविड संकटानंतर विना निर्बंध यंदा पुन्हा पहिल्याप्रमाणे बोर्डाची परीक्षा पार पडली आहे. यंदा परीक्षेच्या काळात कोविड चे संकट नव्हते पण शिक्षक संघटनांनी बंदात सहभागी होत काही दिवस पेपर तपासणीचे काम बंद ठेवले होते. त्याचा फटका निकालावर होणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती पण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 10वी, 12वीचे निकाल ( SSC, HSC Results 2023 ) हे यंदा वेळेवरच लावले जाणार आहेत. अद्याप महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून कोणत्याही निकाल तारखेची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतू निकालाच्या तात्पुरत्या तारखा 10 वी चा निकाल हा जून महिन्यात 10 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे तर 12वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदा 10वीची परीक्षा 25 मार्चला संपली आहे. तर 12वीची परीक्षा 21 मार्च दिवशी संपली आहे. परीक्षेनंतर तीन महिन्याच्या आत निकाल जाहीर केले जातात. मागील वर्षी 8 जूनला बारावीचा निकाल जाहीर झाला होता. तर 10वीचा निकाल 17 जून दिवशी जाहीर केला जाणार आहे. आता यंदा कधी निकाल लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 12वीच्या निकालावर अनेकांचे देशा-परदेशातील उच्च शिक्षण अवलंबून असते. त्यामुळे बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्याचे आव्हान बोर्डासमोर आहे. New Education Policy Rollout in Maharashtra: नवीन शैक्षणिक धोरण येत्या जून पासून लागू होणार, इंजिनियरिंगचे धडे मराठी भाषेतून मिळणार; दीपक केसरकर यांची माहिती .
कसा पहाल तुमचा बोर्ड परीक्षांचा निकाल?
दहावी, बारावीचे निकाल ऑनलाईन जाहीर केले जातात. mahresult.nic.in सह बोर्डाच्या अन्य अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांचे विषय निहाय मार्क्स जाहीर केले जातात. दुपारी 1 च्या सुमारास हा ऑनलाईन निकाल जाहीर केला जातो त्यानंतर काही दिवसांनी शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका दिली जाते.