भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) आज संध्याकाळी म्हणजेच 7 ऑगस्टला ICAI CA फाउंडेशन जून परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला. या वर्षी, ICAI CA फाउंडेशन परीक्षा जून 2023 मध्ये घेण्यात आल्या होत्या. ICAI ने सीए फाउंडेशन जून परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली होती. ICAI CA साठी बसलेले उमेदवार ICAI ची अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जाऊन त्यांचे परीक्षेचे निकाल तपासू शकतात. यासह उमेदवार त्यांचे निकाल icai.org आणि icaiexam.icai.org वर देखील पाहू शकतात. (हेही वाचा: 20 Universities Declared Fake: UGC कडून देशातील 20 विद्यापीठे 'बनावट' म्हणून घोषित; पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, दिल्लीत सर्वाधिक)

जाणून घ्या कसा पाहाल तुमचा निकाल-

सर्वप्रथम ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in ला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील ‘CA Foundation June 2023 Results’ लिंकवर क्लिक करा

त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर प्रविष्ट करून सबमिटवर क्लिक करा

तुमचा CA Foundation June 2023 Results स्क्रीनवर दिसेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)