केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) 10 वी आणि 12 वी टर्म -1 बोर्ड परीक्षांची डेटशीट जाहीर केली आहे. टर्म -1 च्या 12 वीच्या परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होतील आणि 22 डिसेंबरला संपतील. तसेच, 10 वी टर्म -1 परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 11 डिसेंबर रोजी संपेल. परीक्षेची वेळ सकाळी 11:30 ते दुपारी 1 पर्यंत असेल. बोर्डाने सांगितले होते की, इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या 'टर्म -1' च्या बोर्ड परीक्षा 'ऑफलाइन' घेण्यात येतील. कोरोना संसर्गामुळे, सीबीएसई 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येत आहेत, ज्यासाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना 20 मिनिटे वाचन वेळ दिला जाईल, पूर्वी ही वेळ 15 मिनिटे होती. बोर्ड परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)