Delhi Public School Bomb Threat: द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली असून त्यात शाळांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या धोक्याची माहिती शाळा प्रशासनाने सकाळी सव्वा पाचच्या सुमारास अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत कडक पाळत ठेवण्यात आली आहे. पोलिस ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजधानी दिल्लीत अशा घटना सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
येथे पाहा पोस्ट,
Delhi: Another bomb threat has been issued to Delhi Public School (DPS) in Dwarka. DPS informed the fire department about the threat at around 5:15 AM. Immediately, teams from the fire department and Delhi Police reached the school campus and began an investigation pic.twitter.com/RL63HotGGe
— IANS (@ians_india) December 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)