PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विज्ञान भवन येथे 'आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023' चे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत. 23-24 सप्टेंबर, 2023 रोजी होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 चे आयोजन बार कौन्सिल ऑफ इंडिया ने केले आहे. ‘न्याय वितरण प्रणाली पुढील उदयोन्मुख आव्हाने’ ही या परिषदेची संकल्पना आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्‍या महत्त्वाच्या विविध कायदे विषयक मुद्द्यांवर अर्थपूर्ण संवाद आणि चर्चा, कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे आणि कायदेविषयक मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्य मजबूत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या परिषदेत देशातील विविध नामावंत न्यायधीश, अनेक क्षेत्रातील व्यवसायिक आणि जागतिक पातळीवरील कायदे तज्ञ सहभागी होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)