Man Attacks & Threatens Journalists: दिल्लीतील विजय चौकातून मंगळवारी संसद भवनाबाहेर घडलेल्या एका घटनेत एका व्यक्तीने एका पत्रकारावर हल्ला केला आणि तिथे उपस्थित असलेल्या माध्यमांना धमकावले. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, मनोज चौधरी म्हणून स्वत:ची ओळख देणारा हा व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांना धमकावताना दिसत आहे. "काट डालुंगा, खबर की तय्यारी कर के रखना (तुम्हाला सर्व कापून टाकू, तुम्ही सर्व बातम्यांसाठी तयार रहा) असं पत्रकरांना धमकवत आहे.
धक्कादायक व्हिडिओमध्ये, तो माणूस पत्रकारांना धमकावत असताना पोलिसांनी त्याला घेरले आणि त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्या व्यक्तीला बाहेर काढताना दिसत असतानाही तो ओरडतो, "पुन्हा एकदा मीडियावाल्यांना मारहाण करीन. मी आतापासून तुम्हा लोकांना वाचवत आहे. बाहेर येऊन तुम्हाला कापून टाकेन. माझे नाव लक्षात ठेवा - मनोज चौधरी, असं या व्हिडिओतून दिसत आहे. पोलीसांकडून या प्रकरणांत चौकशी चालू केली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत देखील त्यांने पत्रकारांना धमकी दिली आहे.
पाहा व्हिडिओ
#DelhiPolice detains a suspicious person at media stand in Vijay Chowk opposite #ParliamentHouse. This person is openly telling the media people – today I have left, remember the name, I will return and then I will chop.#ManipurHorror #Nuh #NuhViolence #Mewat #Haryanaviolence pic.twitter.com/eewFB5jgnc
— विवेक सिंह नेताजी (@INCVivekSingh) August 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)