Delhi Accident: दिल्लीत भरधाव कार अनियंत्रित झाली त्यामुळे बाजारातून जात असताना भीषण अपघात घडून आला. या अपघातात कारने काही क्षणातच 10 ते 12 जणांना धडक दिली. ही थरारक घटना बाजारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असलून ७ ते ८ जणांना जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दिल्लीतील गाझीपूर भागात बुधवारी घडली. रात्रीचे साडेनऊ वाजता बाजारात लोकांची गर्दी असताना ही घटना घडलेली व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- कानपूरमध्ये भटक्या कुत्र्याची तरुणाकडून निर्घृण हत्या; घटना CCTV मध्ये कैद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)