सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयवाडा येथून हेलिकॉप्टरने निघाले असताना त्यांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली. आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फुगे उडवले. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते छतावर काळे फुगे धरुन उभे होते. ते 'मोदी गो बॅक'चे नारे देतानाही ऐकू आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी त्रुटी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
🔴 PM's Andhra Visit: Protesters Release Balloons Close To His Chopper https://t.co/FMJ6336eC6 pic.twitter.com/UXaEPmXTIu
— NDTV (@ndtv) July 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)