छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात 19 ऑक्टोबरपर्यंत पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके,हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाशाद्वारे विमान उड्डाणमार्गात अडथळा आणण्यास प्रतिबंध करणारे आदेश जारी केले आहेत-मुंबई पोलीस उपआयुक्त एस.चैतन्य यांनी ही माहिती दिली.

बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 नुसार 24 सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मुंबईमध्ये 24 सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)