होळी साजरी करण्याचे निमित्त करुन पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील महिला, तरुणींवर पाण्याचे फुगे फेकण्याचे उद्दाम आणि असभ्य वर्तन काही तरुणांनी केले आहे. या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. तरुणांनी हे वर्तन एफसी रोडच्या मुख्य गेटवरुन तुकाराम पादुका चौकाकडे जाताना केले. मुलींची सुरक्षीतता आणि शैक्षणीक नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्या सारख्या शहरात अशा घटना सामाजिक चिंतेचा विषय ठरल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)