Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये जांजगीर चांपा जिल्ह्यात अपघात झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारचा घात झाला आहे. धक्कादायक म्हणजे या भीषण अपघातात नववधून आणि नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरधाव कारला ट्रकची धडक लागली. या धडकेत कार संपुर्ण चक्काचूर झाली आहे. ट्रक चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. वऱ्हाडी मंडळी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली कारने निघाले होते. दरम्यान पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली.
जांजगीर चाम्पा ज़िले में दर्दनाक सड़क हादसे में
दुल्हन सहित 5 की मौत।
पामगढ से अकलतरा की ओर जा रही कार को अनियंत्रित ट्रक ने मारी ठोकर।
ट्रक चालक ट्रक छोड़ कर फरार हो गया है।#accident @spjanjgirchampa pic.twitter.com/5EpDLwfCYk
— Anshuman Sharma (@anshuman_sunona) December 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)