Delhi Accident Video: दिल्लीत कॅनॉट प्लेस परिसरात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दिल्ली पोलिस कर्मचाऱ्याला एका एसयुव्ही कारने धडक दिली आहे. या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर जखम झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना 24- 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. दिल्ली पोलिसांनी या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे, सद्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने ते हवेत उडाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)