BYJU Layoffs 2024: आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसने १,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

बायजूसने त्यांच्या १,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा नोटीस पिरीयडही पूर्ण न करू देता फोन कॉलद्वारे कपात करणे सुरू केले आहे.

BYJU Layoffs 2024: आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसने १,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ
Photo Credit - x

BYJU Layoffs 2024: बायजूस ही एडिटेक कंपनी गेल्या २ वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आतातर, कंपनीने त्यांच्या १,५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात, बायजूसने आपली सर्व कार्यालये बंद केली होती. कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे पगार विलंबित आहेत. 31 मार्च 2024 पासून ही कर्मचारी कपात सुरू झाली आहे. कंपनी आर्थिक संकटात सापडल्यामुळे कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. 2022 मध्ये कपनीने 10,000 कर्मचारी काढून टाकले होते. (हेही वाचा :Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).