Manipur Viral Video Case: गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. गेल्या आठवड्यात दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर परेड करण्यात आली, त्यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आता या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गृह मंत्रालयाने तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विरोधकांकडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात होती. अखेर आता या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू करण्यात येणार आहे.
Ministry of Home Affairs (MHA) to refer Manipur viral video case to CBI pic.twitter.com/KzSJmNYJpc
— ANI (@ANI) July 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)