पासपोर्ट अर्जांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) ची मागणीही वाढली आहे. या अनपेक्षित वाढीवर मात करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून, PCC सेवांसाठीचे अर्ज भारतभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (POPSKs) उपलब्ध होतील. त्यामुळे पासपोर्ट बनवणाऱ्यांना सोपे होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की मंत्रालय पासपोर्ट संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी काम करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)