नोएडातील एका महिलेने झटपट डिलिव्हरी ॲपद्वारे आइस्क्रीमचा टब ऑर्डर केला होता. आईस्क्रीम टबमध्ये गोम असल्याचा दावा महिलेने केला होता. यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावर दीपा देवी नावाच्या महिलेने एक पोस्ट टाकल्याचे सांगण्यात येत आहे.  महिला ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे अमूलचे म्हणणे आहे. आम्ही सतत ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी आम्ही रात्री 9.30 नंतर भेटण्याबाबत बोललो. ग्राहकांच्या भेटीदरम्यान आम्ही आईस्क्रीमचा बॉक्सही मागवला जेणेकरून त्याची तपासणी करता येईल. परंतु, महिलेने बॉक्स देण्यास नकार दिला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)