Punjab Acid Attack: पंजाबमधील पाटियाला येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.एका दुकानदारावर अज्ञात हल्लेखोरांनी अॅसिड फेकून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दोन ते तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि तरुणाच्या अंगावर अॅसिड फेकले. ही घटना पाटीयाला येथील सनौर बाजारातील आहे. या अॅसिड हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून आरोपी फरार झाल्याचे दिसले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे. निखिल असं या तरुणाचे नाव असून तो या भारात हार्डवेअरच्या दुकानाचा मालक आहे. थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Two unknown people entered the shop in #Patiala and threw acid on the shopkeeper. The police have started investigating the CCTV footage and trying to arrest the accused. pic.twitter.com/PApJQAmuMf
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)