Mumbai Acid Attack Case: मुंबईत एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरवर (Live-in Partner) अॅसिड (Acid) फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी ही महिला पाण्याची टाकी भरण्यासाठी उठली असता ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश पुजारी, असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी 62 वर्षांचा आहे तर त्याचा लिव्ह-इन पार्टनर 54 वर्षांचा आहे. दोघेही काळबादेवीजवळील चाळीत राहतात.
लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सांगितले की, महेश पुराजी याचे त्याच्या साथीदारासोबत भांडण झाले. त्यानंतर तो परत आला आणि त्याने पीडित महिलेवर अॅसिड ओतले. अॅसिडने जळालेल्या महिलेला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. (हेही वाचा -Delhi Acid Attack: दिल्लीत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर तरुणाने फेकले अॅसिड; मुलीची प्रकृती चिंताजनक, Watch Video)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आमची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिस पथकाने लगेचचं आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही 25 वर्षांपासून एकत्र राहत होते. महेश पुजारी याच्या दारूच्या सवयीमुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये देशात अॅसिड फेकण्याच्या 102 घटनांची नोंद झाली आहे. ही संख्या 2019 मध्ये 150 आणि 2020 मध्ये 105 होती. मिळालेल्या माहितीनुसार, अॅसिड फेकण्याच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये झाल्या आहेत. देशात दरवर्षी घडणाऱ्या सुमारे निम्म्या केसेसची नोंद येथून होते.
अॅसिड हल्ल्यातील 83 टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर 54 टक्के प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले. 2015 मध्ये, केंद्रीय गृह मंत्रालयाने, सर्व राज्यांना पाठवलेल्या सल्लागारात, अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांची जलद सुनावणी करण्याचे आवाहन केले आहे.