Delhi Acid Attack: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत महिलांसोबत विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार द्वारका परिसरात एका मुलाने विद्यार्थिनीवर अॅसिड (Acid Attack) फेकले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे अधिकारीही रुग्णालयात पोहोचले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या पीसीआरला सकाळी 9 वाजताच्या सुमारास मोहन गार्डन पोलिस स्टेशन परिसरात एका मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या घटनेबाबत फोन आला. आज सकाळी 7.30 च्या सुमारास एका 17 वर्षीय मुलीवर दोन दुचाकीस्वारांनी अॅसिडसदृश पदार्थाचा वापर करून हल्ला केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा -Abortion Pill Case Bengaluru: गर्भपाताची गोळी घेतल्याने 33 वर्षीय महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल)
दिल्ली के द्वारका मोड़ इलाके में एक स्कूल की छात्रा पर एक लड़के ने तेजाब फेंका।
CCTV में 2 लड़के बाइक पर आते हैं और एसिड डालते दिख रखे हैं@deepakbishtNews reports pic.twitter.com/NSvX3Godof
— Shehla J (@Shehl) December 14, 2022
घटनेच्या वेळी पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत होती. पीडितेने दोन ओळखीच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी सुमित नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमागे कौटुंबिक वादाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
द्वारका मोड़ के पास एक स्कूली छात्रा पर तेज़ाब फेंका। हमारी टीम पीड़िता की मदद के लिए अस्पताल पहुँच रही है। बेटी को इंसाफ़ दिलाएँगे। दिल्ली महिला आयोग सालों से देश में तेज़ाब बैन करने की लड़ाई लड़ रहा है। कब जगेंगी सरकारें?
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) December 14, 2022
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "द्वारका मोडजवळ एका शाळकरी मुलीवर अॅसिड फेकण्यात आले. पीडितेच्या मदतीसाठी आमची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहे. आम्ही मुलीला न्याय मिळवून देणार. दिल्ली महिला आयोगाने देशात अॅसिडवर बंदी घालण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा दिला आहे. आता या सरकारला कधी जाग येणार?" असा प्रश्न स्वाती मालीवाल यांनी विचारला आहे.