Kerala: भारतात पती-पत्नीचे नाते अत्यंत घट्ट आणि पवित्र मानले जाते. दोघेही एकमेकांसाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतात. असं म्हणतात की जगात सगळी संकटे येतात पण दोघांच्या नात्यात दुरावा येत नाही. काही वेळा परस्पर मतभेद होतात पण ते मिटवले जातात. प्रत्येक नवरा आपल्या बायकोला घाबरतो हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला आहे. पत्नीच्या भीतीने पती घरातून गायब झाला आणि दीड वर्ष घरी आलाचं नाही. आता पोलिसांनी त्याला शोधून काढले. दीड वर्षांपूर्वी केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यातून भाड्याच्या घरातून बेपत्ता झालेल्या 34 वर्षीय व्यक्तीचा शोध आता इडुक्की जिल्ह्यातील एका गावात लागला आहे.
Kerala Man, Missing For Over A Year, Found, Says Was "Scared Of Wife" https://t.co/wEXH9FjOHw pic.twitter.com/V6VnerZAXk
— NDTV (@ndtv) July 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)