Andhra Pradesh Food Poisoning: आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील अपोलो हेल्थ युनिव्हर्सिटीमध्ये(Chittoor Apollo Health University) 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा( Food Poisoning) झाल्याच्या गंभीर घटना घडली. 21 ऑगस्ट रोजी अपोलो हेल्थ युनिव्हर्सिटीमध्ये ही घटना घडली. सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तातडीने चित्तूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. IANS च्या व्हिडिओमध्ये डॉक्टर विद्यार्थ्यांवर उपचार करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे युनिव्हर्सिटीमधील अन्नाच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.(हेही वाचा:Pune Food Poisoning: खेडमध्ये 50 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा; पोटदुखी, उलट्यांच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल )

विषबाधा झाल्यामुळे काहींची प्रकृती गंभीर झाली होती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)