Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्पातील मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. तामिळनाडू केरळ सीमेवर पोलिसांनी एका व्यक्तील १४ लाख रुपयांसह अटक केले आहे. शर्टमध्ये लपवून तरुण १४ लाख रुपये घेऊन जात होता. पोलिसांनी त्याला अटक करत मोठी कारवाई सुरु केली आहे. अधिक माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी रक्कम जप्त केली आहेत.आयकर विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यात येणार आहे. आचारसंहितेनुसार, एखाद्या व्यक्तीला फक्त ५०,००० रुपये घेऊन जाण्याची परवानगी आहे. या रकमेपेक्षा जास्त रक्कम बाळगण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)