BBM 4 फेम किरण माने यांच्यासाठी सातारा मध्ये आज जंगी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. एका मराठी मालिकेतून त्यांची हाकालपट्टी झाल्यानंतर पहिल्यांदा टेलिव्हिजन वर ते बिग बॉस मधून आले होते. या रिएलिटी शो मध्ये देखील त्यांची बेधडक भूमिका चर्चेचा विषय बनली होती. पण 100 दिवसांचा प्रवास 52 वर्षीय किरण माने यांनी सह स्पर्धकांना टक्कर देत पूर्ण केल्याने त्यांंचा विशेष चाहतावर्ग बनला आहे. आज सातार्‍यात दुपारी 3 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर त्यांची मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्याचं पोस्टर देखील मानेंनी शेअर करत चाहत्यांच्या प्रेमाने भारावून गेल्याची पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)