The Boys Season 4 Teaser: अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनची वेब सिरीज 'द बॉईज' (The Boys) चौथ्या सीझनसह परतत आहे. या बहुप्रतिक्षित सीझनचा टीझर नुकताच CCXP वर दाखवण्यात आला. एमी-नॉमिनेटेड हिट ड्रामा सिरीज पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये तिच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी सज्ज आहे. जागतिक हिट वेब सिरीज 'द बॉईज'च्या चौथ्या सीझनची पहिली झलक CCXP या जगातील सर्वात मोठ्या विनोदी संमेलनात टीझरद्वारे दाखवण्यात आली. एमी-नॉमिनेटेड सीरिजच्या अत्यंत अपेक्षित चौथ्या सीझनचा पहिला लूक पाहून संमेलनाला उपस्थित असलेले चाहते आश्चर्यचकित झाले. (हेही वाचा - Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट, चित्रपटाचे शुटिंग अचानक थांबवले)
Let's light this candle. Season 4 comin' to your tubes 2024. pic.twitter.com/qhanFuMrcq
— prime video IN (@PrimeVideoIN) December 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)