‘Stree 2’ Fever Continues: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 हा 2024 चा सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट ठरला आहे. इतर कोणताही चित्रपट स्त्री 2 (Stree 2) या चित्रपटाच्या यशाच्या जवळ नाही. 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या हॉरर कॉमेडीने अलीकडेच बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटातील आकर्षक गाण्यांनीही लोकांचे लक्ष वेधले आहे. 'आयी नई' (Aayi Nai Song) पासून 'आज की रात'(Aaj Ki Raat Song)पर्यंत, चित्रपटाच्या यशात गाण्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे हे नाकारता येणार नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांचे गाण्यांवरचे व्हिडीओ शेअर करून गाण्यांप्रती त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. आता, असाच आणखी एक व्हिडिओ पॅरिसमधून समोर आला आहे. आयी नई गाण्यावर नाचत तरूणांचा एक गट इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. पद्मजा कदम नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. (हेही वाचा: Shraddha Kapoor's Bouncer Pushes Fan: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला श्रध्दा कपूरच्या बाउन्सरने दिला धक्का, घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video))
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)