Shraddha Kapoor's Bouncer Pushes Fan: बॉलिवूडची ब्यूटी क्वीन अभिनेत्री श्रध्दा कपूरच्या बाउन्सने एका चाहत्याला धक्का दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईत भुवन बामच्या 'ताजा खबर' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली असताना ही घटना घडली. श्रद्धा पापाराझीसाठी पोज देत अनेक फोटो आणि व्हिडिओ काढत असातना एक चाहता सेल्फी घेण्यासाठी पुढे आला त्यावेळी बाउन्सने धक्का दिला. (हेही वाचा- काही कट्स नंतर कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' होऊ शकतो रिलीज; सेन्सॉर बोर्डाकडून स्पष्टीकरण)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी श्रध्दा कपूर मुंबईत भुवन बामच्या ताजा खबर या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या स्क्रींनिगला हजेरी लावली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, श्रध्दा कपूर तिच्या कारमधून बाहेर पडून रेड कार्पेटवर येत असताना चाहत्यांनी कारजवळ गर्दी केली. त्यावेळी एक चाहता तिच्या जवळ सेल्फी घेण्यासाठी धावला. हे पाहताच, बाउन्सने हाताने त्याला धक्का दिला. ही घटना एकाने फोनमध्ये कैद केली. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
View this post on Instagram
या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर एकाने या पोस्टवर कंमेट केले आहे की, चाहत्यांनी सेलिब्रिटींपासून अंतर राखले पाहिजे आणि त्यांच्या आसपास गर्दी करू नये. श्रध्दासह आणखी काही कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.