Most Popular Indian Movies of 2024: सध्याचे 2024 वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. अशात आयएमडीबीने ने वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी केवळ प्रेक्षकांच्या पसंतींवर प्रकाश टाकत नाही तर भारतीय मनोरंजन उद्योगातील विविधता आणि गुणवत्ता देखील दर्शवते. प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या कल्की 2898 एडी या चित्रपटाने आयएमडीबी यादीत पहिले स्थान मिळवले आहे. यानंतर स्त्री 2 दुसऱ्या तर महाराजा हा तामिळ सिनेमा तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर शैतान, तर फायटरला पाचवे स्थान मिळाले आहे. पुढे मंजुम्मेल बॉईज 6वे स्थान, भूल भुलैया 3 सातवे स्थान, किल आठवे स्थान, सिंघम अगेनला नववे स्थान आणि लापता लेडीजला 10 वे स्थान मिळाले आहे.
ही आयएमडीबी यादी 2024 मध्ये 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर आधारित आहे, ज्यांचे आयएमडीबी रेटिंग 5 किंवा अधिक आहे. (हेही वाचा: Singham Again OTT Release Date: थिएटरनंतर आता ओटीटीवर गाजणार 'सिंघम अगेन'; कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? जाणून घ्या)
यावर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट-
Presenting the Most Popular Indian Movies of 2024 that captured your hearts and kept you coming back for more! 💛
Check out the full list on the IMDb YouTube channel!https://t.co/UrpuS7Fhzg
— IMDb India (@IMDb_in) December 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)