रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'मी वसंतराव' या चित्रपटाची अद्यापही चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रेक्षक, समीक्षकांपासून सिनेसृष्टीतील कलावंतांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव केला. एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा पाहून प्रत्येकालाच जगण्याची वेगळी ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. 'मी वसंतराव' अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरत असतानाच पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे देखील चित्रपट पाहून भारावून गेले. 'मी वसंतराव'ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)