प्रविण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित 'धर्मवीर' (Dharmaveer) चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आहे. हा चित्रपट अजूनही बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' सिनेमा आता झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 17 जूनला या सिनेमाचा प्रिमिअर होणार आहे. प्रसाद ओकने 'धर्मवीर' सिनेमाचा ट्रेलर शेअर करत लिहिले आहे, 'धर्मवीर' आता झी 5 वर..!!! माणूस जपणे हाच ज्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म, तो धर्मवीर येतोय 17 जूनपासून थेट तुमच्या भेटीला...2022 चा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा फक्त झी 5 वर!".
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)