सचिन पिळगावकर प्रस्तुत 'स्थळ' सिनेमाचा टीझर आज रसिकांच्या भेटीला आला आहे. 7 मार्च दिवशी रीलीज होणारा हा सिनेमा एका अरेंज मॅरेज वर आधारित आहे. टीझर मध्ये तीन मुली लग्नासाठी उत्सुक मुलाची चौकशी करताना दिसत आहेत. या सिनेमामध्ये ग्रामीण भागातील मुलींच्या स्वातंत्र्याबद्दल प्रकाश टाकण्यात आला आहे. 'स्थळ' हा सिनेमा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह 29 महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे, तर 16 पेक्षा जास्त पुरस्कारही या चित्रपटाने जिंकले आहेत. अखेर आता हा सिनेमा रीलीज साठी सज्ज झाला आहे.
स्थळ टीझर
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)