महेश टिळेकर दिग्दर्शित "हवाहवाई" चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) लाँच करण्यात आले आहे. "द ग्रेट इंडियन किचन" यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन आता "हवाहवाई" या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. "हवाहवाई" हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर ही फ्रेश जोडी याचित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)