ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. कोल्हापूरात राहत्या घरी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. भालचंद्र कुलकर्णी यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’ या चित्रपटात ते झळकले आहेत. ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे लोकप्रिय गाणं त्यांच्यावर चित्रित झालेले आहे.
पहा ट्वीट
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या निधनाने अनेक नावाजलेल्या चित्रपटांत आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
आई-जगदंबे त्यांच्या आत्म्यास शांती लाभूदे💐💐 pic.twitter.com/KOKcRqqXou
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)