‘बॉईज 3’ मधील ‘लग्नाळू 2.0’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)