आज दिवाळी पाडव्याचा दिवस आहे. दिवाळी पाडवा निमित्त पती-पत्नीमधील स्नेह वृद्धिंगत व्हावं सेलिब्रेशन करण्याची पद्धत आहे. पत्नी पतीचं औक्षण करून शुभकामना मागते. हिंदू धर्मियांच्या साडेतीन शुभ मुहूर्तांच्या दिवसांपैकी हा एक दिवस असतो. त्यामुळे अनेक शुभ कामांची सुरूवात, मोठी खरेदी देखील हा शुभ दिवस पाहून केली जाते. मराठी सेलिबीटींनी आजच्या दिवाळी पाडव्याला काय केल? पहा इथे

आदेश बांदेकर- सुचित्रा बांदेकर

आदेश बांदेकर- सुचित्रा बांदेकर या जोडप्यासाठी यंदाचा पाडवा खास आहे. त्यांच्या लग्नाचा 33 वा वाढदिवस आज पाडव्याच्या दिवशी आला आहे. आदेश बांदेकर- सुचित्रा बांदेकर यांच्या कॉलेज जीवनातील जवळच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं छोटेखानी सेलिब्रेशन केलं आहे.

सोनाली कुलकर्णी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीने यंदा पाडव्याचा मुहूर्त साधत नव्या घरात प्रवेश केला आहे. दुबईत सोनालीने नवं घर घेतलं आहे. सोनालीचं लग्न दुबईस्थित कुणाल बेनोडेकरशी झालं आहे.

मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकर

मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकर या जोडप्याने नवी कार घेतली आहे. सोशल मीडीयामध्ये त्यांनी नव्या गाडीचे फोटोज शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)