एसी लोकलमुळे साध्या लोकलचं वेळापत्रक अनेकदा कोलमडतं. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.  कधी कधी तर एसी लोकलचं तिकीट काढूनही साध्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया जातात.  अभिनेत्री अक्षता आपटेने तिचा हा अनुभव शेअर केला आहे. तसेच तिने या सगळ्या प्रकरावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे.  अक्षताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं. असे तिनं म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshata Atul Apte (@akshataapte)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)