26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित 'मेजर' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. देशाच्या खऱ्या हिरोवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर 26/11 चे भीषण चित्र दाखवण्यासाठी पुरेसा आहे. ट्रेलरमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते मेजर बनण्यापर्यंत आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करण्यापर्यंतची झलक दिसते. मेजर संदीप उन्नीकृष्णनची भूमिका अभिनेता आदिवी शेषाने केली आहे. ज्याद्वारे मेजर संदीप यांच्या पराक्रमाची गाथा चित्रित करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)