सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता सलमानने या चित्रपटाचा ट्रेलरची तारीख चाहत्यांशी शेअर केली आहे. सलमान खानने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज तारीख सांगितली. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख चाहत्यांना कळताच सर्वांनी आनंदाने उड्या मारल्या. सलमान खानचा हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे, तर चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा पोस्टर
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)